You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत भाजपा किसान मोर्चाच्या वतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत भाजपा किसान मोर्चाच्या वतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत भाजपा किसान मोर्चाच्या वतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले*

*पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोन वरून चर्चा करुन सर्व समस्या मार्गी लावल्या*

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने शेतकरी व बागायतदारांच्या विविध प्रश्नांबाबत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी यांचे समवेत चर्चा करण्यात आली . यावेळी चर्चेमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री. प्रभाकर सावंत , माजी आमदार श्री. राजन तेली, किसान मोर्चा प्रभारी तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , किसान मोर्चा ॲग्रोवनचे श्री.प्रफुल्ल उर्फ बाळू प्रभू , किसान मोर्चा जिल्हा चिटणीस श्री. विजय रेडकर , होडावडा उपसरपंच श्री.राजबा सावंत , शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे उपस्थित होते.
निवेदनातील प्रमुख मागण्यामध्ये आंब्यावरील *थ्रीप्स* रोगाचा प्रादुर्भाव होऊन आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून काजू वर *टी मॉस्कीटो* या किडीचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि या दोन्ही किटकांची वाढ ही वातावरणातील बदलामुळे होते. त्यामुळे दोन्ही किटकापासून झालेल्या नुकसानीचा फळपीक विमा मध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात आली असता , यावर्षी पासून सदर बाबींच्या सामावेश करण्यात येईल असे आश्वासन दिले .
कित्येक वर्षापासुन प्रलंबित असलेला वेदर स्टेशन चा प्रश्न पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी चुटकीसरशी सोडवला व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ वेदर स्टेशन बसविण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून प्रती स्टेशन रु. ३ लाख प्रमाणे रु. ५१ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच फळपीक विमा कालावधी १ डिसेंबर ते १५ में आहे त्याऐवजी १ आक्टोबर ते १५ में असा पुढच्या वर्षी पासून करण्यात येईल असे ठामपणे कृषी अधिकारी श्री.राऊत साहेब यांनी सांगितले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कृषी सिंचन विहीर प्रस्ताव वर्ग २ च्या ७/१२ मुळे फेटाळण्यात आल्याचे निवेदनाद्वारे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणले असता , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांची एकत्रित सभा येत्या आठ दिवसांत ओरोस येथे बोलावून एकत्रितरित्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात यावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
किसान मोर्चाने मुद्देसूदपणे मांडलेल्या प्रश्नांमुळे पालकमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेबांनी सिंधुदुर्ग किसान मोर्चाचे अभिनंदन केले.

संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा