You are currently viewing येत्या २८ तारखे‌ला विधानभवनावर‌ महामोर्चा – सचिन अहिर

येत्या २८ तारखे‌ला विधानभवनावर‌ महामोर्चा – सचिन अहिर

*येत्या २८ तारखे‌ला विधानभवनावर‌ महामोर्चा – सचिन अहिर*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर आता स्वस्थ बसणार नाहीत आणि सरकारलाही स्वस्थ बसू देणार नाही. येत्या २८ तारखेला गिरणी कामगार आपल्या कुटुंबियांसमवेत राज्यव्यापी महामोर्चा काढून सरकारला आपली ताकद दाखवून देतील, अशी‌ ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, शिवसेनेचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी गिरणी कामगारांच्या आंदोलनात बोलताना दिली.

गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावरील दिरंगाई आणि गिरण्यांच्या चाळींच्या पुनर्बांधणीवर चालढकलपणा करणार्‍या शासनाला जाग आणण्यासाठी आज गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने (७ फेब्रुवारी) लालबाग, भारतमाता सिनेमागृह येथे गिरणी कामगारांचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. समन्वयक जयश्री खाडिलकर पांडे, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियन आणि सेंच्युरी मिल कामगार एकता मंच यांचा कृती संघटनेत सहभाग होता. एनटीसी चाळ रहिवाशी कृती समिती आणि खाजगी गिरणी चाळ रहिवाशी मंडळ यांनी आंदोलनात सहभागी होऊन गिरणी कामगार लढ्याला संघर्षाची धार आणली‌ होती. या प्रसंगी उबाठा शिवसेनेचे आमदार अजय‌ चौधरी, नगरसेवक अनिल कोकीळ, इंटक नेते अनिल गणाचार्य, नाट्यकर्मी सुभाष ढवण यांनी आपल्या भाषणात गिरणी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

येत्या २६ तारखे पासून राज्याचे अल्पकालीन अधिवेशन पार पाडणार असून हीच संधी साधून हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कामगार चळवळीसाठी वेचले आहे. त्यांना राज्य सरकार कडून संनियंत्रण समितीवर घेण्यात आले नाही, यावर आसूड ओढून सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले, पात्रता निश्चिती हा कामगारांची दिशाभूल करणारा प्रकार आहे. त्याद्वारे सरकारचा घरे कमी करण्याचा डाव असून, त्या विरुद्ध आता कामगारांना अधिक संघटित व्हावे लागेल. गिरण्यांच्या चाळीच्या पुनर्बांधणीच्या प्रश्नावर आपली दिल्लीमध्ये सचिव पातळीवर बैठक झाली असून, हा प्रश्नही आम्ही लावून धरला आहे. तो तडीस नेल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असेही सचिन अहिर आपल्या भाषणात म्हणाले.

संघटनेच्या समन्वयक जयश्री खाडिलकर पांडे म्हणाल्या, बीडीडी चाळ, धारावी पुनर्वसनातील घरे तसेच मिठागरातील जमिनी गिरणी कामगारांना घरे बांधण्यासाठी मिळाल्याच पाहिजेत, कारण ही आमची पहिल्या पासूनची मागणी आहे. मागील सरकारच्या काळातील २८ हेक्टर जमीन गिरणी कामगारांना घरे बांधणीसाठी मिळावी यासाठी विद्यमान सरकारकडे जोमाने प्रयत्न करणार आहोत, असेही जयश्री खाडिलकर पांडे आपल्या भाषणात म्हणाल्या. सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले, फॉर्म भरलेल्या कामगारांमधील एकाही ‌कामगाराला घराच्या हक्कापासून वंचित होऊ देणार नाही.

सर्वश्री महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे, सेक्रेटरी जयंवत गावडे, सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर, सरचिटणीस जितेंद्र राणे, संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, एनटीसी चाळ रहिवासी कृती समितीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब आंग्रे आदीनी आपले विचार मांडले.

किरण गावडे, महेश हेंद्रे, कानू मालुसरे आदी रहिवाशी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी रहिवाश्यांसह आंदोलनात सहभागी होऊन राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.

गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, सरकारच्या मालकीची मुंबई शहरालगतच्या ठाणे, कल्याण, डोबिवली,अंबरनाथ आदी ठिकाणाची ११० एकर जमीन गिरणी कामगारांच्या घरांसाठी उपलब्ध करून द्यावी, संक्रमण शिबीरातील घरे गिरणी कामगारांना देण्यात यावीत. एनटीसीच्या बंद पडलेल्या गिरण्यांच्या अतिरिक्त जमिनी गिरणी कामगारांच्या घरे बांधण्यासाठी देण्यात याव्यात, सरकारी योजनेतील जेथे शक्य असतील तेथील घरे गिरणी कामगारांना देण्यात यावीत. मुंबई विकास नियमावलीच्या कायद्यानुसार एनटीसी किंवा खाजगी जमिनीवर गिरणी कामगार तसेच उपभोक्ता रहिवाश्यांना ४०५ क्षेत्रफळाची घरे मिळालीच पाहिजेत, म्हाडाने विकास नियमावली ३३-७ आणि ३३-९ अंतर्गत इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला दिला आहे, तो त्वरीत मंजूर करावा तसेच गिरण्यांच्या चाळीतील अधिकची घरे गिरणी कामगारांना मिळाली पाहिजेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मुख्य मंत्र्यांनी या प्रश्नावर कामगार नेत्यांबरोबर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून, हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा, अशीही निवेदनात मागणी करण्यात आली आहे.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 12 =