You are currently viewing मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत व्यापारी महासंघाच्या व्यापारी एकता मेळाव्याला प्रारंभ

मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत व्यापारी महासंघाच्या व्यापारी एकता मेळाव्याला प्रारंभ

जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, दीपक बेलवलकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन….

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या ३४ व्या व्यापारी एकता मेळावाला कणकवलीत ऑनलाईन पद्धतीने प्रारंभ झाला. यात मान्यवर ऑनलाइन पध्दतीने सहभागी झाले आहेत. व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, कणकवली तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, चेंबर ऑफ कॉमर्स इंडट्रीज अध्यक्ष ललित गांधी यांनी

दीपप्रज्वलन करत मेळाव्याचा शुभारंभ केला.

या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, खा.विनायक राऊत, माजी मंत्री सुरेश प्रभू, आ.नितेश राणे ऑनलाइन सहभागी आहेत. तर येथील चौंडेश्वरी सभागृहात व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर, कणकवली तालुकाध्यक्ष दीपक बेलवलकर, चेंबर ऑफ कॉमर्स इंडट्रीज अध्यक्ष ललित गांधी, सभापती मनोज रावराणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, सुनील सौदागर, मुख्य व्यवस्थापक एसबीआय लक्ष्मण सरबळकर,गुंतवणूक सल्लागार डी.बी देसाई, कर अधिकारी श्री.आजगेकर, विनय सामंत, सीए अमोल खानोलकर, राजन नाईक उपस्थित आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा