प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली ९ सप्टेंबरला भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी
सावंतवाडीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती; ४०० हून अधिक पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी होणार
सावंतवाडी
भारतीय जनता पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक ९ सप्टेंबर रोजी सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील ४०० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहतील, अशी माहिती प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नुकतीच पुणे येथे भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक झाली. या बैठकीला चार हजारांहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्तारित कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीलाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार प्रमोद जठार, अतुल काळसेकर तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ कार्यकारिणी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासकामांबद्दल अभिनंदन ठराव मंजूर केला जाणार असून, त्यानंतर पक्षाच्या आगामी वाटचालीसंदर्भातील राजकीय प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधान अशा २५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीनिमित्त १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे नियोजन, विविध उपक्रम आणि त्याची रूपरेषा या विस्तारित कार्यकारिणी बैठकीत निश्चित करण्यात येणार असल्याचे प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सहकार आघाडीचे जिल्हा संयोजक रवी मडगावकर, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, तालुका मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, वेंगुर्ले तालुका मंडळ अध्यक्ष पप्पू परब, शहर मंडळ अध्यक्ष तथा नगरपंचायत सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, माजी सभापती पंकज पेडणेकर, पंचायत समिती सदस्य महेश धुरी, दिलीप भालेकर, सागर ढोकरे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
एकसंध आणि प्रभावी हेडिंग करा
बातमी अधिक संक्षिप्त करा
उपस्थित मान्यवरांची यादी संक्षिप्त करा
