You are currently viewing मालवण चौके येथे दोन डंपरची समोरासमोर धडक

मालवण चौके येथे दोन डंपरची समोरासमोर धडक

मालवण चौके येथे दोन डंपरची समोरासमोर धडक

मालवण :

वाळू भरून कुडाळकडे जाणारा डंपर आणि वाळू भरण्यासाठी जाणारा डंपर याची चौके येथे समोरासमोर धडक बसून अपघात झाला. हा अपघात शुक्रवारी पहाटे २ वा. च्या सुमारास झाला. अपघात एवढा भयानक होता एका डंपरचे चाक धडीसह रस्त्यापासून बऱ्याच अंतरावर जावून पडलेले होते.
घटनास्थळावरुन डपरच्या धडकेची तीव्रता लक्षात येते. वाळू वाहतूक करणारे डंपर चालक किती वेगाने गाड्या चालवतात हे यावरून दिसून येते. अपघातात कुणी जखमी झाले की नाही हे समजू शकले नाही. एक डंपर अतिवेगाने जावून दुसऱ्या डंपरला धडकला. गाडीचा अतिवेग, अतिघाई, चालकांचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या डंपर चालकांवर वेळीच आळा घातला नाही तर मोठा अपघात होवून जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा