You are currently viewing सेवानिवृत्त नायब सुभेदार अण्णा सावंत यांचे दुःखद निधन..

सेवानिवृत्त नायब सुभेदार अण्णा सावंत यांचे दुःखद निधन..

सेवानिवृत्त नायब सुभेदार अण्णा सावंत यांचे दुःखद निधन..

कुडाळ.

पणदूर सावंतवाडा येथील रहिवाशी आणि भारतीय सैन्य दलामध्ये सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले नायब सुभेदार UNIT 1988 भगवान(अण्णा) वसंत सावंत,वय 47 यांचे आज नाशिक येथील लष्कराच्या रुग्णालयात छोट्या शस्त्रक्रिये नंतर उपचारादरम्यान दुःखद निधन झाले आहे.त्यांनी 24 वर्षे भारतीय सैन्यात देशाची सेवा केली.निधना नंतरही त्यांनी किडनी, हृदय,डोळे ई. अवयव दान करून देश सेवा केली आहे.त्यांना भारतीय सैन्य दलातर्फे सुमारे एक ते दोनच्या दरम्यान मानवंदना देण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुरवातीच्या राजकारणातील ढाण्या वाघ म्हणून सुप्रसिद्ध कै.चीटोजी उर्फ जीजी सावंत यांचे ते नातू होते. लष्करातील सेवेनंतर त्यांची नुकतीच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली होती. परंतु त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

त्यांच्या निधनाने पणदूर गावातील एक सेवातत्पर आणि मनमिळावू माजी सैनिकास गाव मुकला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांवर आलेल्या या दुःखात सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + fifteen =