You are currently viewing शिरंगे येथील एस.टी.बस गावातील बस स्थानका पर्यंत जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय

शिरंगे येथील एस.टी.बस गावातील बस स्थानका पर्यंत जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय

दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे पुनर्वसन गाव हा तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पात पुनर्वसित झालेला गाव असून गेली काही वर्षे शासकीय एस .टी महामंडळ ची बस सेवा सुरळीत पणे सुरू असून गेले काही महिने लॉकडाऊन काळात एस. टी बस सेवा बंद होती, परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी एस .टी महामंडळाने एस .टी बस सेवा पुन्हा सुरू केली असून तेव्हा पासून शिरंगे गावात येणारी एस. टी बस गावातील बस स्थानका पर्यंत जात नसून गावातील बस स्थानका पासून आठशे मीटर अलीकडे असलेल्या मुख्य रस्त्यावरून परतत असल्याने ग्राहक वर्गात नाराजी दिसून येत आहे. गावातील मुख्य रस्ता हा बस स्थानका पासून लांब असल्याने काही गाववासीयांना एस. टी बस चा लाभ घेता येत नसून एस. टी गावात येत असून सुद्धा गावातील काही ग्राहक वर्ग एस .टी बस सेवे पासून वंचित आहे ,तसेच शिरंगे पुनर्वसन मध्ये एस .टी बस दिवसातून तीन वेळा येत असून गाव बाजारपेठे पासून पाच किलोमीटर लांब असल्याने व बाजारपेठेत जाण्यासाठी गावात अन्य कोणत्याही प्रकारचे साधन उपलब्द नसल्याने गाववासीयांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडालेली दिसत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =