You are currently viewing ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा शुक्रवारी ६वा दिक्षांत समारंभ

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा शुक्रवारी ६वा दिक्षांत समारंभ

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा शुक्रवारी ६वा दिक्षांत समारंभ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत २८०५ विद्यार्थ्यांना बहाल होणार पदवी

पुणेः

एआयटी आर्ट, डिजाईन आणि टॅक्‍नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे ६व्यादिक्षांत समारंभाचे शुक्रवार दि.१३ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वा. आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मा.श्री.नितीनजी गडकरी (केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, भारत सरकार)यांच्या प्रमुख उपस्थितीत तर विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली तत्वज्ञ संत ज्ञानेश्वर विश्वशांती डोम, विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे पार पडणार आहे. यंदा विद्यापीठातील विक्रमी२८०५ विद्यार्थ्यांना कार्यक्रमातून पदवी बहाल करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्त्रो), बंगळुरूचे माजी चेअरमन पद्मश्री. डॉ.ए.एस.किरण कुमार यांना विज्ञान व तंत्रज्ञानातील योगदानाबद्दल भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. एमआयटी एडीटी विद्यापीठाने २०१५ मध्ये स्थापना झाल्यापासून केलेला प्रवास उल्लेखनीय आहे. २०१६-१७ साली २६ विद्यार्थ्यांना पदवी देऊन सुरु झालेली विद्यापीठाची अविश्वनिय परंपरा यंदा विक्रमी २८०५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यापर्यंतआली आहे. यंदाच्या भव्य समारंभात, 23 विद्यार्थ्यांना पीएचडी, ५१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तर १८८ विद्यार्थ्यांना रँक होल्डर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थ्यांसह ७ हजारपेक्षा अधिक लोक देशभरातून हजर राहणार आहेत.
विद्यापीठाने परीक्षेसाठी संपूर्ण डिजीटल प्रणाली अवलंबली असून त्यामुळे निर्विघ्न परिक्षेची अंमलबजावणी, वेळेत अचून निकाल व सर्व प्रक्रियेतील पारदर्शकता ही ‘एमआयटी एडीटी’ची आता खासियत बनली आहे. दिक्षांत समारंभाच्या आजतागायत झालेल्या ५ कार्यक्रमांत मा. श्री. विनोदजी तावडे, इस्त्रोचे माजी चेअरमन पद्मविभूषण डॉ. जी. माधवन नायर, राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, डीआरडीओचे माजी चेअरमन डॉ.जी.सतीशरेड्डी, इस्त्रोचे चेअरमन डॉ.एस. सोमनाथ यांनी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे यंदा आम्ही मा. श्री. नितीनजी गडकरी यांचे विद्यापीठात स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.महेश चोपडे, परिक्षा नियंत्रक डॉ.ज्ञानदेव निलवर्ण, अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता डॉ.रामचंद्र पुजेरी, संचालक अभियंत्रिकी शाखा डॉ.विरेंद्र शेटे यांनी यावेळी दिली आहे.

*-कोट-*
“यंदाच्या दिक्षांत समारंभात 23 पीएचडी, ५१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांसह एकूण २८०५ विद्यार्थ्यांना एमआयटी एडीटीतर्फे पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मा.श्री.नितीनजी गडकरी व पद्मश्री. डॉ.ए.एस किरण कुमार विद्यापीठात येणार असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. ”
– *प्रा.डॉ. मंगेश कराड,*
कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष,
एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.

*आपलाच,*
जनसंपर्क अधिकारी,
एमआयटी एडीटी विद्यापीठ,
विश्वराजबाग, पुणे

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 7 =