*अमृतमहोत्सवा निमित्त नगरशेठ श्री. अशोकशेठ शहा सातारा यांचा हृद्य सत्कार*
*निरागस बालमैत्र सृष्टीतील सुंदर नाते*……वि.ग.सातपुते.
10 मार्च 2025 रोजी सातारा येथील हॉटेल सुरूबन येथे अगदी अनऔपचरिक असा अंत्यत सुंदर भावनिक कृतज्ञता सोहळा शहा कुटुंबियांनी सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत साजरा केला.
*मैत्र* हे अत्यन्त सुंदर असे जगातील सर्वश्रेष्ठ नाते आहे याची प्रचिती आज या सुंदर कार्यक्रमात आली. श्री. अशोक शहा यांचे सर्वच बालमित्र की ज्यांनी आज वयाची 75 हत्तरी पूर्ण केली आहे असे सर्वच मित्र आज या कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित होते. हे वैशिष्ठ होते.
जीवनाच्या कृतार्थी टप्प्यावर बालमित्रांची सोबत असणे हे परमभाग्य म्हणावे लागेल. या सर्वमित्रांचा श्री. अशोक शहा कुटुंबाने अत्यन्त कृतज्ञतेने आवर्जून सत्कार केला त्याने सर्वच भारावून गेले. यामध्ये साताऱ्यातील डेक्कन एज्युकेशन संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल या शाळेतील माजी विद्यार्थी सर्वश्री वासुदेव किरवे , सोमनाथ भाटिया , जयंत केंजळे , अशोक गोडबोले , विजय पंडित , प्रमोद भुरके , प्रकाश चौधरी , शशी घारगे , सूर्यकांत शेलार , मनोहर माळवदे , शिवदिन कुलकर्णी , श्रीकांत दिवशिकर , अरविंद गोस्वामी , वि.ग.सातपुते. उपस्थित होते सर्व मित्रांच्या तर्फे मित्रवर्य अशोक शहा व सौ. सुनंदा शहा यांचा पुणेरी पगडी , शाल , श्रीफळ , हार , सातारी पेढ्याचा हार घालून यथोचित सत्कार केला आणि सर्व मित्रांनी आपले मनोगते व्यक्त केली आणि कार्यक्रमाची सांगता झाली.