You are currently viewing तारकर्लीत भारतातील पहिल्या आरमार नावाच्या अत्याधुनिक बोटीचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

तारकर्लीत भारतातील पहिल्या आरमार नावाच्या अत्याधुनिक बोटीचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

बोटीचे स्टेअरिंग ना.आदित्य ठाकरे यांच्या हाती*

*खा. विनायक राऊत, ना. उदय सामंत, आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, अरुण दुधवडकर यांच्याकडुन ना. आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत*

*मालवणच्या पर्यटन विकासासाठी भरघोस निधी देण्याची आ.वैभव नाईक यांची मागणी*

राज्याचे पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असताना चिपी विमानतळावर तसेच मालवण शिवसेना शाखेतसमोर खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना हार घालून पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले. महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाच्या एमटीडीसी अंतर्गत मालवण तारकर्ली येथे समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पॉंडेचेरी वरून आणण्यात आलेल्या भारतातील पहिल्या आरमार नावाच्या बोटीचे उद्घाटन ना. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.


तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या ताफ्यात हि अत्याधुनिक बोट असून यावेळी ना.आदित्य ठाकरे यांनी स्टेअरिंग हाती घेत बोट चालविण्याच्या आनंद घेतला. या बोटीत चेंजिंग रूम. अत्याधुनिक स्वच्छतागृह अत्याधुनिक सोयी सुविधा आहेत. त्यामुळे बोटीच्या माध्यमातून रात्री सुद्धा स्कुबा डायव्हिंग करता येणार आहे. त्यामुळे पर्यटन जिल्ह्यात पर्यटनाचे आणखी एक दालन खुले झाले आहे. तद्नंतर तारकर्ली येथील स्कुबा डायव्हिंग सेंटरला ना. आदित्य ठाकरे यांनी भेट देत उपलब्ध अत्याधुनिक उपकरणे व सामग्रीची, तसेच स्कुबा डायव्हिंग टॅंकची पाहणी केली. एमटीडीसीच्या इमारतीवरून समुद्र किनारपट्टी व एमटीडीसी परिसराची पाहणी केली. याप्रसंगी तारकर्ली, देवबाग, मालवण येथील पर्यटन व्यवसायिकांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांची निवेदने दिली. वायरी जि.प.शाळा येथे ना.आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.त्याचबरोबर मालवणच्या पर्यटन विकासासाठी भरघोस निधी देण्याची मागणी यावेळी आ.वैभव नाईक यांनी ना.आदित्य ठाकरे यांच्याकडे केली.
यावेळी शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते , जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, जलपर्यटन विभागाचे दिनेश कांबळी, साहसी पर्यटन क्षेत्राचे रोहित आयरे, एमटीडीसीचे डॉ. सारंग कुलकर्णी, तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, बबन शिंदे, हरी खोबरेकर, अमित पेडणेकर, सुशांत नाईक, महेश कांदळगावकर, नितीन वाळके, मंदार केणी,बबन बोभाटे, मंदार शिरसाट,यतीन खोत, रुपेश पावसकर, रमेश कद्रेकर, अनिल केळुसकर आदींसह शिवसेना,युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =