You are currently viewing जिल्हास्तरीय शालेय सिलंबम लाठीकाठी स्पर्धेत सैनिक स्कूलचे यश

जिल्हास्तरीय शालेय सिलंबम लाठीकाठी स्पर्धेत सैनिक स्कूलचे यश

आंबोली

जिल्हास्तरीय शालेय सिलंबम लाठीकाठी स्पर्धेचे आयोजन बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल, जानवली कणकवली येथे दि. १२ रोजी नुकत्याच आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील वयोगटात सैनिक स्कूलचा विद्यार्थी कॅडेट सोहम संतोष खवणेकर याने प्रथम क्रमांक पटकावला.

स्पर्धेचे उद्घाटन बाल शिवाजी इंग्लिश मेडियम स्कूल जानवली चे मुख्याध्यापक श्री. सावंत सर आणि जिल्हा सिलंबम असोसिएशन चे अध्यक्ष श्री. विवेक राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हयातील अनेक खेळाडूंनी या लाठीकाठी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. लाठीकाठी हा महाराष्ट्राचा अत्यंत जुना आणि लोकप्रिय खेळ आहे.. कॅडेट सोहम खवणेकर याच्या यशाबद्दल सैनिक स्कूलचे अध्यक्ष मान. पी.एफ. डान्टस सर, सचिव श्री. सुनिल राऊळ सर, संचालक श्री. जॉय डान्टस सर, सर्व संचालक, कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एन. डि. गावडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा