You are currently viewing डॉ रुपेश पाटकर यांना सरस्वती लक्ष्मण पवार साहित्य पुरस्कार जाहीर…

डॉ रुपेश पाटकर यांना सरस्वती लक्ष्मण पवार साहित्य पुरस्कार जाहीर…

कणकवली

डॉ.रूपेश पाटकर यांना यंदाचा सरस्वती लक्ष्मण पवार साहित्‍य पुरस्कार जाहीर झाला आहे. सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार दिला जातो. यात यंदा डॉ.पाटकर यांच्या “अर्ज मधले दिवस” या पुस्तकाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

डॉ रुपेश पाटकर हे गोवा आणि बांदा येथील मनोविकार तज्ञ म्‍हणून सेवा देत आहेत. ‘अर्ज मधील दिवस’ हे शरीर विक्री करणाऱ्या स्त्रियांच्या दुःखाचे खरेखुरे हृदयद्रावक प्रकटीकरण आहे. हे समाजाचेच घटक असूनही ते नेहमीच तिरस्करणीय, दुर्लक्षित आणि वंचित राहिले आहेत. त्यांच्या जगण्याचं वास्तव प्रतिबिंब व त्यांच्या पुनर्वसनाचे ‘अर्ज’ या सामाजिक संस्थेने केलेले प्रयत्न यांचा ज्यात उल्लेख आहे अशा अर्ज मधील दिवस ला हा पुरस्कार जाहीर करून शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या सोडवण्यावर भर द्यावा हा सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचा उद्देश आहे. रोख रक्कम रुपये १० हजार आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचा हा पुरस्कार १ मार्च २०२३ यादिवशी सदाशिव पवार गुरुजी यांच्या जयंतीदिनी प्रदान करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा