You are currently viewing रत्नागिरीतील ओणी येथे रंगणार गझल मंथन साहित्य संस्थेचा गझल मुशायरा

रत्नागिरीतील ओणी येथे रंगणार गझल मंथन साहित्य संस्थेचा गझल मुशायरा

*निःशुल्क गझल कार्यशाळेचे सुद्धा आयोजन*

 

रत्नागिरी / (प्रतिनिधी) :

गझल मंथन साहित्य संस्था आणि रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीतर्फे रविवार दि. १० डिसेंबर रोजी ओणी जि. रत्नागिरी येथे नवोदितांसाठी निःशुल्क मराठी गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन केले आहे. गझल कार्यशाळेनंतर मान्यवरांचा गझल मुशायरा रंगणार आहे.

गझल कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात सुप्रसिद्ध गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी व सुप्रसिद्ध गझलकार डॉ. राज रणधीर हे मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा ओणी, ता. राजापूर जि. रत्नागिरी येथील नूतन विद्यामंदिरात घेण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर नोंदणी करण्यात येणार आहे. गझल लेखन शिकण्याची इच्छा असणाऱ्यांनी संजय कुळये यांच्या 9860096030 या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हाॅटसअँपद्वारे नाव नोंदणी करावी. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला सहभाग प्रमाणपत्र तसेच प्राविण्य प्राप्त करणाऱ्या पाच प्रशिक्षणार्थींना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात मान्यवर गझलकारांचा मुशायरा होणार आहे. तरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वासुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, कोकण विभाग उपप्रमुख संजय कुळये, कोकण विभाग सहसचिव सुनेत्रा जोशी, रत्नागिरी जिल्हाध्यक्षा पौर्णिमा पवार यांनी केले आहे.

____________________________

भरत माळी

प्रसिद्धीप्रमुख

गझल मंथन साहित्य संस्था

मो. 9420168806

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − three =