You are currently viewing मालवणात नरकासुर धिंडसाठी पोलिसांकडून वेळ निश्चित

मालवणात नरकासुर धिंडसाठी पोलिसांकडून वेळ निश्चित

मालवणात नरकासुर धिंडसाठी पोलिसांकडून वेळ निश्चित

मालवण

नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी मालवण शहरामध्ये नरकासूराच्या प्रतिमा दहन करण्यासाठी भरड नाका ते बंदर जेटी पर्यंत नरकासुराची धिंड काढण्याची परवानगी मिळावी यासाठी आज मालवण पोलीस स्थानकात नरकासूर मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी सर्व मंडळांचे मुद्दे लक्षात घेत शनिवारी दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत व १२ नोव्हेंबर रविवारी पहाटे ५ वाजल्यापासून पुढे अशी नरकासुर धिंड साठी परवानगी दिली आहे.

दरवर्षी नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी रात्री पासून ते नरक चतुर्दशीदिवशी सकाळपर्यंत मालवण शहरात नरकासूर प्रतिमांची धिंड काढण्यात येते. तसेच नरकासुर स्पर्धाही आयोजित करण्यात येतात. यामध्ये मालवणातील अनेक बालगोपाळ मंडळे सहभागी होऊन नरकासुराच्या मोठमोठ्या प्रतिमा साकारतात. तर अलीकडे मुंबई तसेच इतर ठिकाणाहून अव्वल दर्जाचे बँजो वादकही बोलविण्यात येतात. त्याचप्रमाणे याही वर्षी त्याच उत्साहात मालवण शहरातील मंडळे नरकासुराच्या प्रतिमा बनवित आहेत. या पार्श्वभूमीवर याही वर्षी नरकासुराची धिंड काढण्यास परवानगी मिळावी यासाठी आज मालवण पोलीस स्थानकात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भरड बॉईज, महापुरुष रेवतळे मित्रमंडळ, बाजार बॉईज, धुरीवाडा बॉईज, गाबितवाडा बॉईज, राजकोट बॉईज, चोरलेक्स कंपनी, दांडी बॉईज, ईस्वटी महापुरुष देऊळवाडा या मंडळांचे सभासद उपस्थित होते.

यावेळी मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी नरकासुर धिंड ही नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी रात्री ११ वाजे पर्यंत व दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजल्या पासून पुढे अशी काढण्यात यावी, तसेच धिंड साठी डीजे चा वापर करू नये असे स्पष्ट केले. या नियमांचे उल्लंघन होणार नाही असे यावेळी उपस्थित मंडळाच्या प्रतिनिधीनी एकमताने सांगितले. त्याचप्रमाणे भरड नाका ते मालवण बंदर जेटी या मार्गावर या वेळेत वाहतुकीचा अडथळा होऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी असणारच आहेत, परंतु सर्व मंडळांच्या स्वयंसेवकांनी दक्षता घ्यावी तसेच सर्वांनी सहकार्य करावे, असे यावेळी पोलीस निरीक्षक श्री. कोल्हे यांनी सांगितले.

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा