वेंगुर्ले प्रथमच युवकांची बोली पध्दतीने संघातील खेळाडू निवडून होणारी जिल्हास्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा

वेंगुर्ले प्रथमच युवकांची बोली पध्दतीने संघातील खेळाडू निवडून होणारी जिल्हास्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा

19 वर्षाखालील खेळाडूंसाठी स्पर्धेसाठी संधी

लिगपध्दतीने क्रिकेट स्पर्धा होणार

वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुका लेदरबॉल क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत व राजू गवंडे अँकॅडमीतर्फे 19 वर्षाखालील तरूण युवकांसाठी दि. 15 ते 21 मार्च या कालावधीत `जिल्हास्तरीय लेदरबॉल 20-20 क्रिकेट स्पर्धा’ आयोजित करण्यांत आली आहे. हि क्रिकेट स्पर्धा बोली पध्दतीने खेळाडूंची निवड संघासाठी करून खेळविली जाणार आहे. खेळाडूंना आपल्यामधील क्रिडागुणाची चुणूक दाखविण्याची संधी देणारी हि स्पर्धा आहे.
प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची जिल्हास्तरीय लेदरबॉल 20-20 क्रिकेट स्पर्धा’ हि आय.पी.एल.च्या धर्तीवर लिग पध्दतीने 19 वर्षाखालील युवकांसाठी खेळविण्यांत येणार आहे. या स्पर्धेतून प्रत्येक खेळाडूस स्वत:मधील खेळाची चुणुक दाखविण्याची संधी मिळणार आहे. यात क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडू युवकाचा जन्म 01 सप्टेंबर 2001 नंतर झालेला असावा. खेळाडू निवड व नोंदणीसाठी दि. 25 फेंब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता वेंगुर्ले कॅम्प येथील क्रिडांगणावर होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आपला जन्मदाखला, आधारकार्ड यांची झेरॉक्सप्रत व पासपोर्ट फोटो आणावयाचा आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी राजू गवंडे -9403557774 यांचेशी संपर्क साधावा. या स्पर्धेत सिंधदुर्ग जिल्हयातील जास्तीत जास्त क्रिकेट खेळाची आवड असलेल्या व हाखेळ खेळत असलेल्या खेळाडूंनी सहभाग घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा