You are currently viewing नीट परीक्षेत उज्वल यश मिळविलेल्या परफेक्ट अकॅडमीच्या दीक्षा तोंडवळकर व भक्ती पाटील यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते गौरव

नीट परीक्षेत उज्वल यश मिळविलेल्या परफेक्ट अकॅडमीच्या दीक्षा तोंडवळकर व भक्ती पाटील यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते गौरव

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्गात राहून नीट परीक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद -आ. वैभव नाईक

 

कुडाळ :

 

नीट या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालामध्ये कुडाळ येथील परफेक्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.यामध्ये कुमारी दीक्षा सुमंत तोंडवळकर हिला 574 गुण मिळाले, तर कुमारी भक्ती सदानंद पाटील हिला 531 गुण मिळाले, तर कु. रविराज रजागे याला 525 गुण मिळाले आहेत. आज परफेक्ट अकॅडमी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमांमध्ये, नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहूनच नीट ची उत्कृष्ट तयारी करता येते हे या विद्यार्थ्यांनी परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवले आहे. याप्रसंगी बोलताना आ. वैभव नाईक यांनी विद्यार्थी तसेच पालक आणि विशेषता परफेक्ट अकॅडमी चे सर्वेसर्वा प्रा.राजाराम परब यांचे विशेष कौतुक केले.

आ. नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रवेश परीक्षा तसेच त्यामानाने मागासलेला पण गेल्या काही वर्षांमध्ये परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील विद्यार्थी इथेच राहून घवघवीत यश मिळवत आहेत. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्गात राहून नीट परीक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद आहे.स्पर्धा परीक्षामध्ये सिंधुदुर्ग मधील विदयार्थी चमकण्यास सुरवात होत आहे.लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून आ. वैभव नाईक यांनी पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा उज्वल निकाल देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, तसेच तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि पूर्ण देशाचे भविष्य आहात या जबाबदारीने अभ्यास करा असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी परफेक्ट अकॅडमी चे चेअरमन प्राध्यापक राजाराम परब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू राऊळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉक्टर एम आर परब, परफेक्ट अकॅडमी चे शिक्षक तसेच कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 6 =