You are currently viewing “घाबरु नका” महाराष्ट्रात नवे सरकार येणार विकासपर्व नव्याने सुरू होणार

“घाबरु नका” महाराष्ट्रात नवे सरकार येणार विकासपर्व नव्याने सुरू होणार

▪️आमदार नितेश राणेंच्या ट्विटने सिंधुदुर्ग भाजपात उत्साहाचे वातावरण.

सिंधुदुर्ग

चिंता नको..महाराष्ट्रात नवे सरकार येणार..विकासपर्व नव्याने पुन्हा सुरू होणार हे ट्विट आहे भाजपा आमदार नितेश राणे यांचे. नितेश राणे यांच्या या ट्विटनंतर सिंधुदुर्ग भाजपात कमालीचा उत्साह संचारला आहे.एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे अत्यंत दोलायमान झाले आहे. औट घटकेचे सरकार अशी अवस्था महाविकास आघाडी सरकारची झालेली आहे.त्यात आमदार नितेश राणेंच्या ट्विटमुळे सिंधुदुर्गातील भाजपा कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर येणाऱ्या भाजपा सरकारमध्ये आमचे नितेश साहेब मंत्री असणार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रीही नितेश साहेबच असणार अशी चर्चा सध्या भाजपा कार्यकर्त्यांत आहे. आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये शिवसेना खा.संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. त्यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणूका होणार असे घाबरवून आमदारांना धमक्या देता काय ? असा सवालही नितेश यांनी राऊत याना विचारला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा