You are currently viewing मालवण-तळाशिल गावाला समुद्र गिळंकृत करण्याचा धोका

मालवण-तळाशिल गावाला समुद्र गिळंकृत करण्याचा धोका

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली भेट:ग्रामस्थांनी वेधले लक्ष

उधाणाच्या वेळी समुद्राचा तळाशिल गावाला धोका निर्माण झाला आहे.या पावसात अनेक वीज पोल समुद्राने गिळंकृत केले आहेत.रस्त्यापलीकडील घरे भीतीच्या छायेत आहेत.गेली अनेक वर्षे मालवण तालुक्यातील तळाशिल येथील समुद्र किनारी धुपप्रतिबंक बंधार्‍याचे रखडलेले १४०० मीटरचे काम तातडीने पुर्ण करण्यासाठी तळाशिल ग्राम विकास मंडळाने मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे लक्ष वेधले. दोन वर्षापूर्वी शासनस्तरावर मंजुर झाले आहे पण निधी अभावी दोन्ही टप्प्यातील कामे रखडली आहेत.याबाबतचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने विवेक रेवंडकर यांनी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांना आज दिले.यावेळी मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव,मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर,मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,शैलेश अंधारी,तालुका सचिव विल्सन गिरकर,मनविसे तालुकाध्यक्ष विनायक गावडे,निखिल गावडे,सचिन गावडे,संतोष सावंत,दिनेश कदम आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
मालवण तालुक्यातील तळाशिल गावाला आज मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी भेट दिली. समुद्र किनारी धुपप्रतिबंक बंधार्‍याचे काम तळशिलच्या दक्षिण टोकाकडुन ५०० मीटर झाले आहे.त्यानंतर मध्ये असणार्‍या ८०० मीटरचे काम वगळून पुन्हा ५०० मीटर बंधार्‍याचे काम ५ वर्षापूर्वी झाले आहे.सावळाराम धाकु चोडणेकर यांच्या घरापासुन ते राजेंद्र एकनाथ केळूसकर यांच्या घरापर्यंत राहिलेल्या ८०० मीटर कामामुळे समुद्राचा धोका निर्माण झाला आहे.तसेच शंकर एकनाथ केळुस्कर त्ते गोविंद नामदेव पेडणेकर यांच्या घरापर्यंतचा ६०० मीटर लांबीचा धुपप्रतिबंक बंधार्‍याचे काम लवकर पुर्ण होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.यावेळी निपुण तांडेल,धर्माजी रेवंडकर,निलेश रेवंडकर,किरण रेवंडकर,सतीश पेडणेकर,पंढरीनाथ सादये,कुणाल पाटकर,सखाराम मलबारे,तात्या टिकम,गणेश रेवंडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + 10 =