You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय

*बुधवारी ८ सप्टेंबरला उद्घाटन*

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष असलेले बाळा गावडे अखेर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून घोषित झाले. जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये असलेले अंतर्गत वाद बाजूला सारत बाळा गावडे यांनी संघटना बांधणी करत जिल्ह्यात काँग्रेसला नवे दिवस दाखवले, त्याचे फलित म्हणजे बाळा गावडे यांच्यावर विश्वास दाखवत पक्षाने त्यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राजकीय प्रवाहात आलेले बाळा गावडे यांनी पंचायत समितीचे सभापती पदापासून जिल्हापरिषद आरोग्य व बांधकाम सभापती पदावर लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्यातील नेतृव गुणांची ओळख करून दिली होती. त्यामुळेच त्यांना काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी देखील दिली होती. तालुकाध्यक्ष असताना तालुक्यात उत्कृष्ट संघटना बांधणी केली होती. परंतु बाळा गावडे हे तालुकास्तरीय नेतृत्व पक्षात मोठे होते म्हणून स्वकीयांचीच त्यांना साथ नाही.
बाळा गावडे यांनी राजकारण हा धंदा न समजता शेतीवर आधारित आपला व्यवसाय उभा केला, राजकिय प्रवाहात येणाऱ्या कार्यकर्त्यांना शेती पूरक उद्योग व्यवसायाची ते महिती देत असतात. कृषी पर्यटनातून रोजगाराची संधी निर्माण करताना वेत्ये येथे कृषी पर्यटन प्रकल्प उभा करून तरुणांना शेतीकडे वळण्यासाठी उत्तम दिशा दाखवली आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादावर राजकारणात येऊन बरेचजण मोठे झालेत, लोकांच्या टाळूवरील लोणी खाऊन करोडपती देखील झाले आणि काहीजण करोडोंचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी, काळे धंदे वाचविण्यासाठी राजकारणात आलेत, परंतु बाळा गावडे यांनी राजकारणात येऊन शेतीवर आधारित उद्योग उभा केला आणि राजकारणातील आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर बाळा गावडे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर बाळा गावडे हे प्रभारी जिल्हाध्यक्ष बनले. त्यांनी जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व अबाधित राखत पक्ष बांधणी केली, तालुकावार पक्षाचे कार्यकर्ते तयार करून काँग्रेसला जिल्ह्यात पुन्हा एकदा सुगीचे दिवस येण्याचं स्वप्न दाखवलं, त्यामुळेच पक्षाने बाळा गावडे यांच्यावर विश्वास दाखवत जिल्हाध्यक्षपदी कायम नियुक्ती दिली. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालय सावंतवाडीत सुरू होत आहे. ८ सप्टेंबरला दुपारी ३.३० वाजता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुभाष चव्हाण हे आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + eight =