You are currently viewing कणकवली तालुक्यात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन

कणकवली तालुक्यात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन

सिंधुदुर्गनगरी :- 

कणकवली तालुक्यातील मौजे आशिये येथील, नवीन वसाहत घर नं. 202 प्रतिभा अपार्टमेंट व परिसर (Location 16 . 2639 N 6971 E ), वरचीवाडी घर नं. 128 व 200 मीटर परिघ (Location 16 . 2488 N 7023 E ), कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 20 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत.
कणकवली तालुक्यात कलमठ बाजारपेठ,
कुंभारवाडी,गोसावीवाडी, बिडयेवाडी येथे कंटेन्मेंट झोन
कणकवली तालुक्यातील मौजे कलमठ बाजारपेठ घर क्र. 1709 (Location 16 . 2636 N 73.6987 E ), कुंभारवाडी घर क्र. 1216 (Location 16 . 2678 N 73. 6898 E ), गोसावीवाडी श्री. रजपूत घर (Location 16 . 2677 73. N 7035 E ), गोसावीवाडी साईराज अपार्टमेंट (Location 16 . 2656 N 7025 E ), बिडयेवाडी, स्वामी समर्थ अपार्टमेंट (Location 16 . 2687 N 73. 7029 E )  मीटर  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 20 सप्टेंबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + twelve =