You are currently viewing प्राधिकरणात आनंद मेळाव्याचे आयोजन

प्राधिकरणात आनंद मेळाव्याचे आयोजन

निगडी, प्राधिकरण-(प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर) :

 

आनंदाचा सण दिवाळी अगदी दारात येऊन ठेपलाय अन् दिवाळीची तयारी मग त्यात फराळाचे साहित्य, विजेच्या रोषणाईचे साहित्य, सजावटीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू, रांगोळी, तोरणे आदींची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. ग्राहकांची गरज आणि व्यापाऱ्यांचा फायदा याचा ताळमेळ साधून स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, स्वावलंबी भारत अभियान आयोजित खास दिवाळी निमित्त दिनांक ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सदरचा आनंद मेळावा दुपारी ४ ते रात्री ९ पर्यंत पेठ क्रमांक २५ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात भरणार असून त्यात महिलांचे स्टॉल्स असणार आहेत आणि सणासाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू, गृहसजावट, इमिटेशन ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, साडी, ड्रेस, ड्रेस मटेरियल, तयार भाजणी, पीठे, उपलब्ध असतील. ग्राहकांनी आनंद मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा