You are currently viewing स्वच्छ्ता शुल्कास भटवाडीचा विरोध…

स्वच्छ्ता शुल्कास भटवाडीचा विरोध…

शुल्क भरणार नाही: नगराध्यक्ष संजू परब यांच्यासाठी निरीक्षक सौ शिरोडकर यांच्याकडे निवेदन.

सावंतवाडी

नगरपालिकेकडून सावंतवाडी शहरातील नागरिकांकडे आकरलेल्या स्वच्छता वापरकर्ता शुल्कास भटवाडी येथील नागरिकांनी विरोध केला असून, आपण हे शुल्क भरणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी त्यांनी आज सहाय्यक कार्यालय निरिक्षक सौ. आसावरी शिरोडकर यांच्यामार्फत नगराध्यक्ष संजू परब यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. यावेळी तेथील नागरिक म्हणाले की, आमच्या राहत्या घरा परिसरात खुप जागा असून, नगरपालिका प्रशासनाने सांगितल्या प्रमाणे आम्ही आमच्या कचऱ्याची विल्हेवाट त्या ठिकाणी लावत असताना देखील, आम्हाला घंटागाडी कडे कचरा देण्याची जबरदस्ती केली जात आहे. आम्हाला घंटागाडीची आवश्यकता नाही. आमच्या परिसरात येणाऱ्या घंटागाडी कडे कोणीही कचरा देत नाही. त्यामुळे आम्ही कोणीही हे शुल्क भरणार नाही असे एकमताने ठरवले आहे. या शुल्कातून भटवाडी परिसराला वगळण्यात यावे अशी मागणी निवेदनातून नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे केली आहे. यावेळी रामचंद्र सुभेदार, सुरेश सरमळकर, बाबा गावडे, नारायण गावडे, चंद्रकांत कांडारकर, सोना गावडे, दिलीप भालेकर, बाबा गावडे, द्रौपदी गावडे आदी नागरिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =