You are currently viewing चिपी एअरपोर्टबाबत मोठा निर्णय…

चिपी एअरपोर्टबाबत मोठा निर्णय…

मुंबई

महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा.ना.श्री.सुभाष देसाई साहेब यांच्या उपस्थितीत मंत्रालय येथे झालेल्या बैठकीमध्ये आज चिपी एअरपोर्टवाबत मोठा निर्णय घेण्यात आला.

सिंधुदुर्ग मधील चिपी एअरपोर्टचे तांत्रिक काम दि.31 डिसेंबर 2020 रोजी पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन आय.आर.बी.(IRB) कंपनीने दिले.

MIDC, IRB, MSEB, BSNL चे वरिष्ठ अधिकारी तसेच पाणीपुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी सिधुदुर्ग या सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव मा.श्री.विनायक राऊत साहेब यांच्या मागणीनुसार मा.ना.श्री.सुभाष देसाई साहेब यांनी मंत्रालय येथे बोलाविली होती. सदर बैठकीमध्ये विमानतळ वाहतूक लवकरात लवकर सुरू करण्याबाबत चर्चा झाली. मा.ना.श्री.सुभाष देसाई साहेब यांनी आदेश दिल्याप्रमाणे IRB चे वरिष्ठ अधिकरी श्री.सुधीर हौसिंग यांनी दि.31.12.2020 रोजी पर्यंत सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून दि.20.01.2021 पर्यंत DGCA  कडून परवाना मिळविला जाईल, असे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 17 =