You are currently viewing एप्रिलमध्ये दांडी येथे भव्य गाबित समाज महोत्सवाचे आयोजन

एप्रिलमध्ये दांडी येथे भव्य गाबित समाज महोत्सवाचे आयोजन

मालवण :

अखिल भारतीय गाबित समाज महासंघ मुंबईतर्फे येत्या एप्रिल 2023 च्या शेवटच्या आठवड्यामध्ये मालवण येथील सुप्रसिध्द दांडी किनारी सलग चार दिवसांसाठी भव्य अशा “गाबित समाज महोत्सवाचे”आयोजन करण्याचा निर्णय मालवण येथे झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

या महोत्सवात गाबित समाजातील विविध प्रकारच्या खाद्य संस्कृतीचे पदार्थ आणि मत्स्य खवय्यांना मत्स्य पदार्थ चाखायला मिळणार आहेत.त्याचबरोबर पर्यटकांना गाबित समाजातील गोवा,कर्नाटक,गुजराथ व इतर देश विदेशातील गाबित समाज बांधवांना एकत्रित आणून समाजातील विविध सांस्कृतिक कलांचे दर्शन घडविले जाणार आहे.

त्यादृष्टीने गाबित समाज महोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन करण्यासाठी मालवण येथे अखिल भारतीय गाबित समाज महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हा गाबित समाज आणि गाबित समाज देवगड,मालवण,वेंगुर्ले शाखांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

सदरील बैठकीमध्ये अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर,उपाध्यक्ष ऍड.काशिनाथ तारी, खजिनदार श्री.नारायण आडकर,मालवण तालुका गाबित समाज अध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, सचिव श्री.महेंद्र पराडकर ,देवगड तालुकाध्यक्ष श्री.संजय पराडकर,उपाध्यक्ष श्री.लक्ष्मण तारी,वेंगुर्ला तालुका सचिव श्री.नागेश गांवकर, श्री.बाबा मोंडकर,श्री. हरि खोबरेकर,सौ.सेजल परब,सौ.अन्वेशा आचरेकर,श्री.बाबी जोगी, दिलीप घारे,अन्वय प्रभू,रमेश तारी,सुहास पराडकर,नरेश हुले, गंगाराम आडकर,धर्माजी आडकर, रश्मिक रोगे , प्रदीप मोर्जे वगैरे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

या महोत्सवाचे औचित्य साधून मासेमारीवरील मत्स्य उद्योजक परिसंवाद,पर्यटन विषयावरील परिसंवाद,मत्स्य संपदा योजना,फिशरमेन व्हीलेज,गाबितांचा शिमगोत्सव, नौकानयन स्पर्धा,जलतरण स्पर्धा, गाबित चषक क्रिकेट स्पर्धा,स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम ,पारंपारिक रापन लावणे व ओढणे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे.त्यामुळे गाबित समाज महोत्सव विविध अंगांनी नटलेला असेल व त्याचा लाभ सर्वांना घेता येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − seven =