You are currently viewing जितेंद्र आव्हाडांचे सावंतवाडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून जल्लोषी स्वागत…

जितेंद्र आव्हाडांचे सावंतवाडी राष्ट्रवादीच्या माध्यमातून जल्लोषी स्वागत…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर असलेल्या राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांचे आज सावंतवाडी विधानसभा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येथील जयप्रकाश चौकात जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी “शरद पवार साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है..!!” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी तालुका सरचिटणीस राकेश नेवगी यांच्यासह पदाधिकार्‍यांची अर्चना घारे यांनी ओळख करुन दिली. यावेळी नेवगी यांनी घातलेल्या टोपीवर हात ठेवून आता कामाला लागा, अशा सर्वांना त्यांनी सुचना केल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्‍यावर असलेल्या श्री. आव्हाड यांचे आज सावंतवाडीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा