You are currently viewing १९ वा चातुर्मास व्रत सोहळा

१९ वा चातुर्मास व्रत सोहळा

वैश्य समाजाचा १९ वा चातुर्मास सोहळा सिंधुदुर्ग येथील वाळकेश्वर मंगल कार्यालयात आषाढ पौर्णिमा बुधवार दिनांक १३ जुलै ते भाद्रपद पौर्णिमा शनिवारी १० सप्टेंबर २०२२ पर्यंत संपन्न होणार आहे,आपल्या सनातन संप्रदायानुसार चातुर्मास व्रत कालावधीमध्ये आपण सर्वांनी आपले सद्गुरू वामनाश्रम महास्वामीजींचे दर्शन घेऊन प्रत्येक दिवशी होणाऱ्या धार्मिक अन आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन श्री गुरूंच्या कृपाप्रसादास पात्र व्हावे, असे आवाहन अध्यक्ष सिताराम उर्फ दादा कुरतडकर यांनी केले आहे.
मुंबई गोवा हमरस्त्यावरील अत्यंत महत्त्वपूर्ण शहर म्हणून कणकवलीची ख्याती सर्वदूर आहे,अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री सच्चीदानंद सदगुरु परमहंस बाबा भालचंद्र महाराज अन कोकण गांधी परमहंस आप्पासाहेब पटवर्धन यांचे वास्तव्य याच शहरात होते,कणकवलीच्या अनेक रथी महारथीनी समाजकारण शेक्षणिक,सांस्कृतिक,राजकारण व इतर तत्सम अनेक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला आहे आणि म्हणूनच १९व्या चातुर्मास सोहळ्याचे यजमानपद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्याला मिळाले याचा मला तालुकाध्यक्ष म्हणून अन चातुर्मास सोहळ्याचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सार्थ अभिमान आहे
कोणताही मेळावा किंवा सोहळा यशस्वी करणेसाठी नेहमीच नियोजन करावे लागते,खेड्यांकडे चला या श्री श्री वामनाश्रम स्वामीजींच्या संदेशाप्रमाणे परराज्यात अन सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी स्वतः अन वैश्यगुरू चातुर्मास समितीचे जिल्हा अध्यक्ष ऍड दीपक अंधारी अन कार्यकारिणीतील सर्वश्री महेंद्रकुमार मुरकर,लऊ पीळणकर, गुरुनाथ पावसकर,प्रा मुरकर सर,नांनचे सर,प्रवीण पोकळे,भालचंद्र अंधारी,चंद्रशेखर वाळके,दिशा अंधारी,सुप्रिया टायशेट्ये,सल्लागार सर्वश्री बाळासाहेब वळंजू,उमेश वाळके,प्रसाद अंधारी,राजन पारकर, नागेश मोरये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अन कणकवली शहरातील अन तालुक्यातील समस्त महिला भगिनी,गुरुसेवक,गुरुसेविका यांचेमार्फत वैश्य बांधव/भगिनींशी संपर्क साधला असता सर्वांनी स्वागत करून सोहळ्यास उपस्थित राहण्याची मनापासून इच्छा प्रदर्शित केली त्यामुळे संपूर्ण देशातील अन खास करून जिल्ह्यातील वैश्य बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील यात शंका नाही,
संपूर्ण ६० दिवसांचे नियोजन करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैश्य समाजाची लोकवस्ती असलेल्या प्रत्येक गावाला किमान १ दिवस प्रत्यक्ष गुरुसेवा करणेची संधी मिळणार आहे,चातुर्मास सोहळ्याचे ठिकाणी भजन कीर्तने करणे,पूजेची तयारी,रांगोळी काढणे,दोन्ही वेळा महाप्रसाद,चहापाणी वितरण यासारख्या अनेक सेवा करणेची संधी मिळणार आहे,चातुर्मास कालावधीत दररोज सकाळी अन संध्याकाळी श्री चंद्रमोळेश्वर देवतांची पूजा विधी संपन्न होणार आहे,याशिवाय विविध धार्मिक यज्ञयाग पारायण चे नियोजन आहे,श्रावण सोमवार, नागपंचमी,श्रीकृष्ण जयंती,श्री गणेश चतुर्थी हे सर्व धार्मिक सण आपल्या स्वामीजींकडून कार्यक्रम स्थळी साजरे करणेत येणार आहेत तसेच विविध मान्यवरांचे भजन,गायन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करणेत आले आहेत,७ ऑगस्टला महिलांसाठी आदिशक्ती मातृशिबिर,१४ ऑगस्ट युवकांसाठी श्रीशंकर युवक शिबीर,२१ ऑगस्ट कन्याकम्ब युवती शिबीर नियोजन करणेत आले आहे, चातुर्मासात सर्व दिवसांचे कार्यक्रम भव्यदिव्य होणेसाठी सर्वांच्या सूचना अन प्रत्यक्ष सहभाग महत्वाचा आहे,
चातुर्मास हा अध्यत्म,निसर्ग यांचा अपूर्व संगम अन समन्वय आहे, या सोहळ्याचे निमित्ताने जिल्ह्यातील समाज बांधवांच्या एकतेची मशाल पेटवून चांगले अन नावीन्यपूर्ण विचारांचे आदानप्रदान होईल व श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींचे कृपाआशीर्वादाने समाज उन्नती अन सर्वांची स्वप्ने सफल होतील, सुखसमृद्धी, चांगले आरोग्य मिळेल यात तिळमात्र शंका नाही,

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 11 =