‘गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान’ हरी खोबरेकर यांनी दिला नारा…

‘गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान’ हरी खोबरेकर यांनी दिला नारा…

‘गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान’ हरी खोबरेकर यांनी दिला नारा…

मालवण

कोरोना महाप्रलयात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी ‘गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे रक्तदान’ हा नारा दिला आहे. त्यानुसार पोईप विभागामार्फत वडाचापाट येथे या रक्तदान शिबिर‌ मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.
संपुर्ण तालुक्यातील गावांमध्ये रक्तदान शिबीराची मोहीम यशस्वीपणे राबविणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली. रक्तदानासाठी आलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा नारळाचे झाड देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, सरपंच नमिता कासले, श्रीकृष्ण पाटकर, पंकज वर्दम, अमित भोगले, आनंद चिरमुले, भाऊ चव्हाण, रुपेश वर्दम, पराग नार्वेकर, अल्पेश निकम, विशाल धुरी, ऋषिकेश नेरूरकर, बाबली पालव, सतीश राठोड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. कोरोना सारख्या भीषण काळात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे‌ डॉक्टरांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा