पोस्टाची 113 वी डाक अदालत 17 डिसेंबरला

पोस्टाची 113 वी डाक अदालत 17 डिसेंबरला

पोस्टाची 113 वी डाक अदालत 17 डिसेंबरला

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र व गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषय काही समस्या किंवा कामकाजाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या कार्यालयात 17 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता 113 वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अधीक्षक डाकघर सिंधुदुर्गनगरी यांनी दिली.

            टपाल खात्याच्या विविध तक्रारीविषयी टपाल, स्पीड पोस्ट काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर आदींबाबतच्या तक्रारींचे यामध्ये समावेश राहणार आहे. टपाल खात्याच्या सेवेबाबत काही तक्रारी असल्यास एच.एम. मंजेश सहाय्यक निर्देशक डाकसेवा (ज.शि.) तथा सचिव डाक अदालत मुख्य पोस्टमास्तर जनरल मुंबई, जी.पी.ओ. इमारत, दुसरा माळा, मुंबई-400001 यांच्या नावे दोन प्रतीत रविवार दि. 15 नोव्हेंबर पर्यंत पोहचतील अशी पाठवावित. तसेच पप्रत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या www.maharashtrapost.gov.in येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा