You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर सांगुळवाडी येथे संपन्न-

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर सांगुळवाडी येथे संपन्न-

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर सांगुळवाडी येथे संपन्न-

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर सांगुळवाडी येथे संपन्न झाले.
दिनांक १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ‘युवकांचा ध्यास ग्राम – शहर विकास’ या प्रमुख संकल्पनेवर आधारीत शिबिरामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जलसंधारण, उन्नत भारत अभियान, सायबर सुरक्षा, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, आरोग्य व रक्तदान श्रेष्ठदान इत्यादी कार्यक्रमांचा समावेश होता. सदर शिबिर कालावधीत गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, बंधारे बांधणे, मतदार जनजागृती , पर्यावरण संवर्धन व नशाबंदी जनजागृती फेरी, विविध सामाजिक विषयावर पथनाट्य सादरीकरण व व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी उपक्रमांमध्ये सर्व स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेलता.
या श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेले महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे यांनी आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांनी आपल्या गावाच्या विकासामध्ये योगदान द्यावे असे आवाहन केले. तर पाहुणे म्हणून लाभलेले महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. शरदचंद्र रावराणे यांनी सदर शिबिराच्या माध्यमातून लाभलेल्या व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शनाचा स्वयंसेवकांनी आपले भावी करिअर घडवण्यासाठी उपयोग करावा असे सांगितले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. एस.काकडे यांनी महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन आपल्या सुप्त गुणांचा विकास करावा असे आवाहन केले.
सदर शिबिर कालावधीमध्ये स्वयंसेवकांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्वयंसेवकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यामध्ये अक्षय जाधव-TYBA (उत्कृष्ट स्वयंसेवक), उत्कर्षा पाटील-FYBCom (उत्कृष्ट स्वयंसेविका), रितेश शिवगण-TYBCom (उत्कृष्ट गट प्रमुख), साहिल जाधव-SYBA (उत्कृष्ट पथनाट्य), इत्यादींना गौरविण्यात आले
या समारोप प्रसंगी व्यासपीठावर सांगुळवाडी गावच्या सरपंच श्रीमती. पूजा रावराणे, मुख्याध्यापिका श्रीम. स्नेहलता राणे, सांगुळवाडी गावचे उपसरपंच श्री. बालाजी रावराणे, ग्रामपंचायत सदस्य श्री. सत्यवान सुतार, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एम. आय. कुंभार, कार्यालयीन अधीक्षक श्री. संजय रावराणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभागप्रमुख डॉ. एम. ए .चौगुले उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा.आर.ए.भोसले, प्रस्तावना प्रा.डॉ.एम. ए .चौगुले व आभार डॉ.एस .सी. राडे-पाटील यांनी केले.

संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क :*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा