You are currently viewing इचलकरंजी प्रेस क्लबचे विविध पुरस्कार जाहीर

इचलकरंजी प्रेस क्लबचे विविध पुरस्कार जाहीर

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

इचलकरंजी प्रेस क्लबच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणार्‍या यंदाच्या वर्षातील विविध पुरस्कारांंची घोषणा आज रविवारी पदाधिकारी व सदस्यांच्या बैठकीत करण्यात आली. यामध्ये प्रेरणा पुरस्कार प्रिती पटवा, सामाजिक कार्य संस्था मैत्री फौंडेशन, उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल भिमराव आव्हाड, प्रबोधन पुरस्कार विद्यार्थी युवक संघटना, चंदूर त्याचबरोबर विशेष गौरव पुरस्कार ऋषिकेश ठाकूर -देसाई यांना जाहीर करण्यात आले.या पुरस्काराचे वितरण लायन्स ब्लड बँकेच्या सभागृहात शनिवार ८ जानेवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

इचलकरंजी प्रेस क्लबचे नूतन पदाधिकारी व सदस्यांची पत्रकार दिन साजरा करणे व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणे या संदर्भात आज रविवारी पत्रकार भवनमध्य बैठक पार पडली. यावेळी प्रेस क्लबचे नूतन अध्यक्ष संजय कुडाळकर यांनी विविध पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये प्रेरणा पुरस्कार प्रिती पटवा, सामाजिक कार्य संस्था मैत्री फौंडेशन, उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल भिमराव आव्हाड, प्रबोधन पुरस्कार विद्यार्थी युवक संघटना, चंदूर त्याचबरोबर विशेष गौरव पुरस्कार ऋषिकेश ठाकूर -देसाई यांना जाहीर करण्यात आले. प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त प्रतिवर्षी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणार्‍या संस्था, व्यक्तीचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. त्यानुसार यंदा वरील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

इचलकरंजी प्रेस क्लब आणि लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने येत्या 8 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता लायन्स ब्लड बँकेच्या सभागृहामध्ये सदरचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. शिवाजी जाधव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे उपस्थित रहाणार असून आम. प्रकाशराव आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती उपाध्यक्ष संजय कुडाळकर यांनी दिली.

प्रेस क्लबच्या बैठकीस उपाध्यक्ष शरद सुखटणकर, सचिव राजेंद्र होळकर, खजिनदार अरुण काशीद, दयानंद लिपारे, संजय खूळ, सागर बाणदार, सुनिल मनोळे, उमेश घोरपडे, आराधना श्रीवास्तव, मयूर चिंदे, अजय काकडे, पदमाकर खुरपे, अरूण वडेकर, रविकिरण चौगुले, अमर चिंदे, बाळासो पाटील, कृष्णात लिपारे, शैलेंद्र चव्हाण ,संतोष काटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + 20 =