You are currently viewing “एक राखी निसर्गासाठी”

“एक राखी निसर्गासाठी”

कुडाळ :

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर क. महाविद्यालय पणदूरतिठा प्रशालेत “एक राखी निसर्गासाठी” उपक्रम साजरा करण्यात आला.
शासनाच्या सामाजिक वनीकरण विभाागाच्या अंतर्गत शाळेच्या राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या वतीने माडाच्या झाडाला राखी बांधून रक्षाबंधन उपक्रम साजरा करण्यात आला.

दरवर्षी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यासाठी संस्था अध्यक्ष मान. श्री. शशिकांत अणावकर सर, संस्था संचालक, यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविला जातो. यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर शाळेत विद्यार्थी उपस्थित नसल्याने मोजक्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उपक्रम पार पडला.

यावेळी शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री. मिलिंद कर्पे , राष्ट्रीय हरित सेना विभागाचे प्रमुख श्री. एस.आर. झेंडे , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत उपक्रम साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा