श्रावण ग्रामपंचायतचे माजी उपसरपंचांचे हृदयविकाराने निधन….

श्रावण ग्रामपंचायतचे माजी उपसरपंचांचे हृदयविकाराने निधन….

मालवण :

कोरोना महामारीत दुसर्‍यांचे प्राण वाचवणारे कोरोना योध्दा, गवळीवाडी ता. मालवणचे ग्रामस्थ व श्रावण ग्रा. पं. सदस्य प्रकाश राजाराम सावंत वय ५६ वर्ष यांचे आज सकाळी दवाखान्यात जात असताना ह्रदयविकाराने निधन झाले.
कै. प्रकाश राजाराम सावंत उर्फ बंबो यांनी श्रावण परीसरात आयुर्वेदिक वैद्य म्हणून ३० वर्षे माणसे व जनावरांची प्रामाणिक व मोफत सेवा केली होती. त्यांनी श्रावण उपसरपंच म्हणुन गेले अडीज वर्षे काम पाहिले होते. तर सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या श्रावण शाखेत गेली तीन वर्षे सुरक्षा रक्षक म्हणुन सेवा बजावत होते.

सर्वांच्या कठीण प्रसंगाला धावणारे व कोणत्याही कामात अग्रेसर असणारे, असे असल्याने ते दशक्रोषीत प्रसिध्द होते. त्यांच्या निधनामुळे परीसरात शोककळा पसरली आहे. कै. प्रकाश सावंत यांच्या पच्शात पत्नी, दोण मुलगे, सुन, मुलगी, जावई, चुलत भाऊ, वहिणी असा परीवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा