You are currently viewing केसरीत पं. स. माजी सदस्य संदीप गावडे यांच्या पॅनलचा विजय..

केसरीत पं. स. माजी सदस्य संदीप गावडे यांच्या पॅनलचा विजय..

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यातील केसरी ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप विजयी ठरली आहे. या ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला होता. यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे समर्थक आणि पंचायत समिती माजी सदस्य संदीप गावडे यांच्या पॅनलने विजय प्राप्त केला आहे. मात्र शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे समर्थक आणि पंचायत समिती माजी सदस्य राघोजी सावंत यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. याठिकाणी सरपंचासह सातही सदस्य भाजपाचे निवडून आले आहेत. दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे केसरी गावी निवासस्थान असून संदीप गावडे कट्टर समर्थक आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा