You are currently viewing १८ डिसेंबर ला कवी विठ्ठल कदम यांच्या कथांचे सिंधुदुर्ग आकाशवाणीवरून प्रसारण

१८ डिसेंबर ला कवी विठ्ठल कदम यांच्या कथांचे सिंधुदुर्ग आकाशवाणीवरून प्रसारण

सिंधुदुर्ग :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक कथालेखक व कांदबरीकार कवी विठ्ठल कदम यांनी ‘सामाजिक संप्रेषणाच्या अनेक’ कथा लिहिलेल्या असून त्यांच्या ‘निवळ’ व ‘आवतं’ हया दोन कथांचे सिंधुदुर्ग आकाशवाणीवरून १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता GMT+0530 (india Standard Time) वरून प्रसारण केले जाणार आहे.

याआधीही कवी विठ्ठल कदम यांची आकाशवाणीवरून मुलाखत, काव्यवाचन, व अभिवाचन प्रसारीत झालेले आहे. साहित्य चळवळीतील विठ्ठल कदम हे आज आघाडीचे नाव आहे. विठ्ठल कदम यांचा ‘ रुमणी’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून, ‘एकदा काय झाले’ हा बालकांसाठी कथा संग्रह, ‘चार पावले दूर’ ही रिमांड होममधील मुलांच्या जगण्यावर प्रकाश टाकणारी कांदबरी वाचकांत प्रिय झालेली आहे. तर ‘मुकरी’ हा त्यांचा आगामी कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असून ‘पासून – पर्यंत’ हा काव्यसंग्रह लककरच प्रकाशित होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा