You are currently viewing मुलुंड पूर्व येथे श्री समर्थ सद्गुरु राऊळ गुरूस्थानी दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

मुलुंड पूर्व येथे श्री समर्थ सद्गुरु राऊळ गुरूस्थानी दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

मुंबई –

श्री समर्थ सद्गुरु राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त मंडळ, मुलुंड (पूर्व) यांच्या वतीने श्री दत्तजयंती उत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजा सोहळा मार्गशीर्ष शुद्ध १५ शके १९४५ मंगळवार दि. २६ डिसेंबर २०२३रोजी डी/ ५ औदुंबर सोसायटी, म्हाडा कॉलनी, मुलुंड (पूर्व), मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. मंडळाचे हे चाळीसावे वर्षे असून यानिमित्ताने श्री दत्तजयंती उत्सव साजरा होत असताना सकाळी ८.३० वा. नित्यनैमित्तिक पूजा प्रारंभ होणार आहे. तसेच श्री सत्यनारायण महापूजेसोबतच श्री गुरूचरित्र पारायण यावर सद्गुरू समर्थ गुरूदास माऊली उपस्थित भक्तांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करणार आहेत. तद्वतच महाआरती, महाप्रसाद, दुपारनंतर नामस्मरण, सुस्वर भजन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले असून समस्त भक्त मंडळींनी उत्सवात सहभागी होऊन आनंदाची लुटी करावी असे आवाहन श्री समर्थ राऊळ महाराज दत्तप्रसाद भक्त व कार्यकारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − four =