You are currently viewing झोळंबे येथे खुल्या भजन स्पर्धेचे ७, ८ नोव्हेंबरला आयोजन

झोळंबे येथे खुल्या भजन स्पर्धेचे ७, ८ नोव्हेंबरला आयोजन

झोळंबे येथे खुल्या भजन स्पर्धेचे ७, ८ नोव्हेंबरला आयोजन

बांदा:

झोळंबे भजनप्रेमी व ग्रामस्थ यांच्या वतीने ७ व ८ नोव्हेंबर रोजी श्री माऊली मंदिरात खुली भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५५५५ रुपये, द्वितीय ३३३३ रुपये, तृतीय २२२२ रुपये, उत्तेजनार्थ ११११ रुपये देण्यात येतील. शिस्तबद्घ संघ व लक्षवेधी संघास प्रत्येकी १००१ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

तसेच उत्कृष्ट गायक, गौळण गायक, हार्मोनियम वादक, पखवाजवादक, तबलावादक, झांजवादक, कोरस, श्रोता यांना वैयक्तिक स्वरुपाची पारितोषिके देण्यात येतील. सर्व विजेत्या संघांना तसेच वैयक्तिक विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी एकूण २० संघांना प्रवेश दिला जाईल.
इच्छुक संघांनी ३० अॉक्टोबर पर्यंत प्रवेश फी ५०० रुपये भरुन नावे नोंदणी करायची आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सागर झोळंबेकर (९४०३६४०४५२) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − seven =