You are currently viewing चार दशकांपासून रस्ता दुर्लक्षित; ओसरगाव ग्रामस्थांचे आंदोलन

चार दशकांपासून रस्ता दुर्लक्षित; ओसरगाव ग्रामस्थांचे आंदोलन

चार दशकांपासून रस्ता दुर्लक्षित; ओसरगाव ग्रामस्थांचे आंदोलन

नालंग घर ते तोरसकर घर रस्त्याची तातडीने डागडुजी व खडीकरण-डांबरीकरणाची मागणी; लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार

कणकवली :

ओसरगाव येथील नालंग घर ते तोरसकर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. गेल्या सुमारे ४० वर्षांपासून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी होत असूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची तातडीने तात्पुरती डागडुजी करण्यात यावी, तसेच भविष्यात रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येईल, याबाबत प्रशासनाने लेखी निवेदन अथवा ठोस आश्वासन द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
“तात्पुरती डागडुजी आणि पुढील कामाबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलनातून उठणार नाही,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. स्थानिक तसेच तालुका प्रशासनाने घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घ्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
प्रशासन घटनास्थळी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देत, “वेळ पडल्यास गणपतीची पूजा याच ठिकाणी करू; मात्र मागण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा