You are currently viewing जिल्ह्यात पावसाचे शतक

जिल्ह्यात पावसाचे शतक

जिल्ह्यात पावसाचे शतक

वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 183.7 मि.मीपाऊस

सिंधुदुर्गनगरी

गेल्या चौवीस तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक 183.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पावसाने शतक केले असून सरासरी 127 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1371.1 मि.मी. पाऊस झाला आहे.

                तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 92.7 (1224.4), मालवण- 117.7 (1319.2), सावंतवाडी- 154.5 (1602), वेंगुर्ला- 183.7 (1409.5), कणकवली- 95.7 (1234.3), कुडाळ- 152 (1454.8), वैभववाडी- 117.5 (1389.9), दोडामार्ग- 112.3(1478.5) असा पाऊस झाला आहे.

                गेल्यावर्षी आजच्या दिवसापर्यंत जिल्ह्यात 1 हजार 131 पूर्णांक 1 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तर पावसाची टक्केवारी 46.6 इतकी होती. आजपर्यंतच्या सरासरीचा विचार करता यंदाच्या वर्षी जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 119.3 टक्के पाऊस झाला आहे. जूनमध्ये पावसाची टक्केवारी 89.3 टक्के इतकी होती. तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने तुट भरून काढली असून सरासरीच्या 217.3 टक्के पाऊस झाला आहे. म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात नेहमीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा