You are currently viewing भाजप नेते एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट!!!

भाजप नेते एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट!!!

 

जळगाव :

 

“माजी आमदार उदयसिंह पडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो माझ्या आदेशावरुनच”, असा गौप्यस्फोट भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उदयसिंह पडवी यांनी मला विचारले होते की, “कोणत्या पक्षात प्रवेश करु तेव्हा मी त्यांना सांगितले की तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा”, असे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले. अनेक सहकारी माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असे म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपाला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

जळगावातल्या एका स्थानिक वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत, एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. खान्देशातील अनेक आमदार माझ्या सोबत आहेत. मग ते देखील राष्ट्रवादीत जाणार का? असा प्रश्न एकनाथ खडसेंना विचारला असता मीच अजून राष्ट्रवादीत गेलो नाही तर त्यांच्या प्रवेशावर मी काय बोलू? असं सूचक वक्तव्य खडसेंनी केलं आहे. तसंच मी अजूनही भाजपात आहे हे सांगायलाही खडसे विसरलेले नाहीत.

खडसेंच्या सल्ल्यानेच प्रवेश : पडवी

राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आमदार उदयसिंह पडवी म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी दिलेल्या सल्ल्याने आणि आदेशानेच मी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आता उदयसिंह पडवी यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर अशाच प्रकारचा आदेश खडसेंनी किती नेत्यांना दिला आहे़, या प्रश्नाचीही चर्चा खान्देशात रंगली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + 2 =