You are currently viewing पशु व कुक्कुटखाद्य खरेदी करतांना पशुपालकांनी सावधनता बाळगावी

पशु व कुक्कुटखाद्य खरेदी करतांना पशुपालकांनी सावधनता बाळगावी

पशु व कुक्कुटखाद्य खरेदी करतांना पशुपालकांनी सावधनता बाळगावी

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील पशुपालकांनी तयार पशुखाद्य व प्रमाणित पशुखाद्य विकत घेताना सावधनता बाळगावी असे आवाहन जिल्हा पशुसंर्धन उपायुक्त डॉ. अ. दे. डांगोरे यांनी दिली.

राज्यातील पशुपालक, शेतकरी, दुध उत्पादक आणि कुक्कुट पक्षी संगोपन यांच्या पशुधन व कुक्कुट व्यवसायासाठी पशु पक्षी खाद्य हा महत्वाचा घटक आहे. पशुपालन, दुग्धउत्पादन व कुक्कुटपालन व्यवसायामध्ये पशुखाद्याची गुणवत्ता ही अतिशय महत्वाची बाब आहे. उत्पादित दुधाचे प्रमाण व त्याची गुणवत्ता, त्याच प्रमाणे पशुआरोग्य आणि त्यांची पुर्नउत्पादन क्षमता ही पशु खाद्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. पशुखाद्याची गुणवत्ता हा पशुपालन व दुग्धव्यवसायाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानके(fssi) यांच्या निर्देशांनुसार राज्यात आयएसआय मार्क (बीआयएस प्रमाणकाप्रमाणे) पशुखाद्याचे उत्पादन व विक्री करणे बंधनकारक आहे.

भारतीय मानक संस्थेच्या (बीआयएस) परवानाधारक पशुखाद्य उत्पादक संस्थानी भारतीय मानक संस्थेच्या प्रमाणकाप्रणनेच पशुखाद्याचे उत्पादन करावे आणि पशुखाद्याच्या पॅकिंग बॅग वर पशुखाद्यातील अन्नघटकांचे प्रमाण (उदा. क्रुड प्रोटिन,क्रुड फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, एश, मॉईस्चर इ.) ठळकपणे नमुद करणे बंधनकारक आहे. त्याच प्रामाणे पॅकिंग बॅग वर, उत्पादक संस्थेचे नाव व पत्ता, उत्पादक परवाना क्रमांक, उत्पादनाचा दिनांक व बॅच क्रमांक, वापराचा अंतिम दिनांक, निव्वळ वजन व विपणन कंपनी चे नाव व पत्ता, या बाबी ही ठळकपणे नमूद केलेल्या असाव्यात.

राज्यातील पशुखाद्य उत्पादक संस्थांचे पशु खाद्य, अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 भारतीय मानक कायदा आणि ग्राहक संरक्षण कायदा 1986 मधील तरतुदीनुसार भारतीय मानक संस्थेच्या (बीआयएस) प्रमाणकाइतके असणे आवश्यक आहे. ज्या पशुखाद्य उत्पादक कंपन्यांनी  बीआयस खाली नोंदणी केली नसेल अशा पशुखाद्य उत्पादकांना शासन निर्णयानुसार एक महिन्याच्या आत भारतीय मानक संस्थेचा परवाना घेणे आवश्यक आहे. परवाना नसलेल्या उत्पादक कंपन्यांना पशुखाद्य बाजारात विक्री करता येणार नाही.

*संवाद मिडिया*
*_–🧤–साई वॉटरप्रुफिंग–💧–_*
*साई वॉटर प्रुफिंगची संपूर्ण महाराष्ट्रसह गोव्यात अग्रेसर सर्व्हिस*

*🙏आमची वैशिष्ट्ये : 👇*
✔️🏬 इमारतीची तोडफोड न करता पावसाळ्यात १०० टक्के संरक्षण,
✔️गराऊंटिंग इंजेक्शन.
✔️ उन्हाळ्यात थंड, हिवाळ्यात उबदारपणा,
✔️पाच वर्षाची हमी.

*श्री आशिष लोके*

*संपर्क : 8080493894 /9420208100*
———————————————-
-वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =