You are currently viewing कंत्राटी शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या शासन निर्णयाची “कासार्डे” येथे निषेध करीत केली होळी

कंत्राटी शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या शासन निर्णयाची “कासार्डे” येथे निषेध करीत केली होळी

शिक्षक भारतीच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद

तळेरे

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासाठी सुधारित आकृतीबंध निश्चित न करता महाराष्ट्र शिक्षण विभागाने काल ११डिसेंबर रोजी केवळ ५हजार मानधनावर यापुढे चतुर्थश्रेणीतील कर्मचारी नेमण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी केलेल्या शासन निर्णयाची होळी करून निषेध नोंदविण्यासाठी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत या शासन निर्णयाच्या
निषर्धात कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या शासन निर्णयाची होळी करुन घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे.
या आंदोलनात शिक्षक भारतीचे पदाधिकारी दत्तात्रय मारकड,संजय भोसले,अवधुत घूले,सौ. सविता जाधव यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी सुनिता कांबळे, आबा राणे, सत्यवान तावडे,निकेतन पावसकर, लक्ष्मण अंबुरे,दिपेंद्र सूतार,बंड्या गोसावी यांच्यासह सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शासनाच्या अन्यायकारक निर्णयाचा निषेध करीत जोरदार घोषणा देण्यात आल्या व हा निर्णय शासनाने त्वरीत मागे घेण्याची जोरदार मागणी यानिमित्ताने आंदोलन कर्त्याकडून करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =