You are currently viewing प्रगतीशील शेतकरी बाळा साळुंके यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा!

प्रगतीशील शेतकरी बाळा साळुंके यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा!

कुडाळ –

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पिंगुळी येथील प्रगतिशील शेतकरी श्री. बाळा रामा साळुंके यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी परंपरागत पद्धतीने साजरा करण्यात आला. महिला मूर्तिकार वर्षा मनोहर गावडे यांनी श्रीकृष्णाची सुबक मूर्ती साकारलेली आहे. याप्रसंगी परोहित भाऊ दांडेकर यांच्या हस्ते विधीयुक्त पूजा अर्चा करण्यात आली. मोठ्या संख्येने भाविकांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद घेतला. यावेळी स्थानिक भजनीबुवा कृष्णा पवार आणि प्रमोद धुरी यांनी सुस्वर भजन सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. भाजपचे ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण आणि सहकारी यांनी दर्शन घेऊन त्यांनी “श्रीकृष्णा जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती दूर होऊन पाऊस पडो व सुजलाम सुफलाम दिवस येवोत” अशी याचना केली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × two =