You are currently viewing राजस्थानी रांगोळी “मांडणा” – म.न.पा. कार्यानुभव शिक्षिका राजश्री बोहरा यांचा गुणगौरव

राजस्थानी रांगोळी “मांडणा” – म.न.पा. कार्यानुभव शिक्षिका राजश्री बोहरा यांचा गुणगौरव

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कला अकादमी तर्फे पारंपरिक रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत म.न.पा. च्या कार्यानुभव शिक्षिका राजश्री बोहरा यांचा प्रथम क्रमांक आला. त्यांनी राजस्थानी लोक परंपरागत “मांडणा” या प्रकाराची सुबक नक्षीकाम असणारी अप्रतिम रांगोळी रेखाटली होती. त्यामुळे ही रांगोळी स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरली. तब्बल आठ तास मेहनत करून ही रांगोळी पूर्ण करण्यात आली.

मनपा चे शिक्षण अधिकारी श्री राजेश कंकाळ यांच्या हस्ते सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व पाच हजार रुपये रोख असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी म.न.पा. चे उपशिक्षणाधिकारी श्री राजू तडवी, श्री अजय वाणी, सौ. सुजाता खरे, सुप्रितंडण श्री निसर सर व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

कला अकादमीचे प्राचार्य श्री दिनकर पवार, व निदेशक श्री
भुषण उदगीरकर, सौ मंजिरी राऊत, व श्री योगेश मोरे तसेच कला शिक्षक श्री अमोल पवार, मानसी पवार व इतर सर्व शिक्षक वृंदाच्या सुयोग्य आयोजनातून ही स्पर्धा साकार झाली. मनपाच्या ना. म. जोशी शाळा सभागृह, करी रोड येथे या रांगोळीचे प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवले असून अनेक उत्तम रांगोळी कलाकारांनी यात सहभाग नोंदवला. सौ. वैशाली गजरमल यांनी काढलेली पैठणीची रांगोळी देखील अतिशय सुबक असून लोकांच्या पसंतीस उतरली.

सौ. राजश्री बोहरा यांच्या यशाबद्दल मनपातील सर्व विशेष शिक्षक, वरिष्ठ शिक्षक, कार्यानुभव शिक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =