You are currently viewing भुताखेतांच्या गोष्टी क्रमांक १४ वा
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

भुताखेतांच्या गोष्टी क्रमांक १४ वा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे, लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

*भुताखेतांच्या गोष्टी*
क्रमांक १४ वा .
➖➖➖➖➖➖➖➖
मित्रहो ,
मी ऐकलेल्या तसेच मला आलेले अनुभव येथे या ग्रुपवर लिहित असतो ..त्यावर प्रत्येकाने विश्वास ठेवावा असे मी कधीच म्हणत नाही .. म्हणणारही नाही …!
मागील १३ व्या भागात मी जी गोष्ट सांगितली…त्याबाबत त्या गावातील बुजुर्ग मंडळीनी त्याला दुजोरा दिला होता ..अनेकांना तसे अनुभव पूर्वी आले होते .. त्यामध्ये आमच्या शेजारी रहाणारे *कै शंकर भाऊ देसाई* म्हणून एक प्राथमिक शिक्षक होते ..उत्तम शिक्षक ,हरहुन्नरी , विद्यार्थ्यांनी शिकावे ही त्यांची अंतरिक तळमळ होती.अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे ..आजही त्यांचे ते काही विद्यार्थी ७५ ते ८० वर्षाचे आहेतही ..त्यांची आठवण काढतात ..ते खरच एक आदर्श व्यक्तिमत्व होते . माझ्या एका कथा संग्रहात ” *माई आणी मास्तर* म्हणून त्यांच्यावर कथा आहे . (ज्येष्ठ संत साहित्यिक गुरुवर्य *डॉ .यू .म .पठाण* सर हे देसाई मास्तरांचे विद्यार्थी ..! )
देसाई मास्तर रोज साताऱ्यातून पुणे बंगलोर या हायवेवरच लिंब ,अनेवाडी गावाच्या पुढे असलेल्या *उडतारे* या गावी प्राथमिक शाळेत शिकवायला अनेक वर्षे जात असत ..२२ मैल रोज सायकलवरुन जायचे व परत यायचे…..(म्हणजे रोज ४४ मेल). त्यांनीही अशा काही घड़लेल्या घटना आम्हा मुलांना सांगितल्या होत्या ..त्याकाळी रस्त्यावर दुतर्फा गर्द झाड़ी होती ..झाडांच्या फांदया ,झावळया गोलाकार गुंतलेल्या होत्या , त्यामुळे एक नैसर्गिक हिरवा बोगदा दिसत असे ..रात्री शुकशुकाट असे . हायवे जरी होता तरी वहातुक आजच्या मानाने खुप कमी होती ..रात्री तर क्वचितच वहातुक होती .
कधीतरी मास्तरांना शाळेतून येण्यास उशीरही झाला होता , अंधाऱ्यारात्री उडताऱ्या पासून एकटे सातारला परत येत असतानाही त्यांना एक विचित्र अनुभव आला होता ..मुळात ते स्वतः धाड़सी होते ..त्यांचे सारे बालपण सातारा येथील अलिकडची माहुली इथेच जन्मगाव असल्यामुळे ( स्मशानाशेजारी) तिथेच गेले होते ..ते सांगत ” आम्ही पोरं जळत्या चितेपाशी बसून शेंगा , कणसं , भाजत असूं .. थंडित शेकोटी समजून गमतीने शेकतही बसत होतो …वगैरे ..! त्यावेळी कधीकधी रात्री आम्हा पोरांना अलिकडच्या घाटावरुन पलिकडच्या घाटापर्यंत नदीच्या पाण्यावरुन पळणारी , उड्या मारणारी , ओरडणारी , दंगा करणारी , पारावरच्या पिंपळाच्या झाडाला लोंबकाळणारी विक्षिप्त माणसे ( भूते) दिसत असत ..
पण आम्हाला कधी त्रास झाला नाही ..रोज तिथे प्रेतं , जळत्या चिता आम्ही कुतूहलाने पहात होतो ..त्यामुळे भुताखेतांची भिती मला वाटली नाही ..पण पिशाच्च्य योनी , आहे याच्यावर माझा विश्वास आहे …त्या रात्री मी शाळेतून अपरात्री परत येताना मला ” अहो मास्तर ! अहो मास्तर ! असा बराचवेळ माझ्याच बायकोच्या आवाजा सारखा चक्क हाका मारणारा आवाज सातत्याने येत होता …२०० ते ३०० यार्ड म्हणजे ७०० ते ८०० फुट अंतरापर्यन्त हा प्रकार चालू होता , कधी कुणीतरी अगदी जवळून पळते आहे असा भासही झाला होता .जोराच्या वाऱ्याने सायकल हलते आहे असे वाटत होते . कुणी तरी जवळपास आहे असे वाटत होते …दिसले नाही . पण ठराविक अंतरावर गेल्यावर जे कुणी पिशाच्च्य होते ते थांबले होते ..असे मास्तर म्हणाले ..आणी पुन्हा एक १५ मिनिटांनी तोच अगदी तसाच ओरडण्याचा आवाज येवू लागला …अनुभवामुळे मी धीराने सायकल चालवित राहिलो , गाव जवळ आले होते … अशा परिस्थितीत रस्त्यात भिवून थांबेयचेच नसते …एवढे मात्र खरे …मी घरी पोहोचलो देखील ..! पण मला अस्वस्थ वाटू लागले , मला अचानक खुप ताप भरला होता …मी माझ्या पत्नीला म्हणजे माईला हा घड़लेला किस्सा सांगितला ..तीने ठिकाण विचारले..! (तिचे माहेर भुईंज होते ) तीला तो परिसर माहिती होता ) तेंव्हा ती चिडली म्हणाली ” अहो कशाला रात्री निघाला ..त्या परिसरात ज्या बाईचा जमिनीच्या वादातुन खून झाला ती चंद्राबाईच भूत अजुन तिथं फिरतं ते तुम्हाला माहिती होतं नां ! तुम्ही ऐकलं होतं नां ..अहो कितीतरी लोकांना तीनं झपाटलं आहे ..! हे सर्व गावाला माहिती आहे …..
➖➖➖➖➖➖➖➖
*©विगसातपुते*
👍👍👍👍👍

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 1 =