You are currently viewing कणकवली पॅटर्न ची होणार मराठवाडा पदवीधर निवडणुकीत पुनरावृत्ती…

कणकवली पॅटर्न ची होणार मराठवाडा पदवीधर निवडणुकीत पुनरावृत्ती…

भाजपा आमदार नितेश राणे हिंगोली जिल्हा प्रभारी

पक्षाने दिली मराठवाडा मतदारसंघात महत्वाची जबाबदारी

आमदार राणे यांचा सुरू झाला प्रचार दौरा

कणकवली
मराठवाडा पदवीधर मतदार संघात भाजपा आमदार नितेश राणे यांचेवर हिंगोली जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ड्याशिंग युवा आमदार म्हणून राज्यात नितेश राणे यांची ख्याती आहे.त्यांच्यावर दिलेल्या या महत्वाच्या जबाबदारी मुळे मराठवाड्यात कणकवली पॅटर्नची पुनरावृत्ती होणार असल्याचा भाजपा नेत्यांना विश्वास आहे.
मराठवाडा पदवीधर मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे शिशीर बोराळकर हे उमेदवार आहेत. हिंगोली जिल्हयात १६ हजार पेक्षा जास्त पदवीधर मते आहेत.आमदार नितेश राणे यांची निवडणूक लढविण्याची वेगळी शैली आहे.जनतेला आपलेसे करून विरोधकांना पराभूत करून एक हाती सत्ता आणण्यात आमदार नितेश राणे माहीर आहेत. म्हणूनच त्यांनी आपल्या मतदार संघातील वैभववाडी, देवगड, कणकवली या नगरपंचायत एकतर्फी निवडून आनल्या.जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचाय अशा प्रत्येक सत्ता केंद्रात शत प्रतिशत भाजपा करणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर पक्षाने हिंगोली जिल्ह्याची दिलेली जबाबदारीने कणकवली मतदार संघाच्या विजयाची पुन्हा प्रचिती येणार आहे. कणकवली विधानसभा निवडणुकीत शिवसेने भाजपा समोर कणकवलीत उमेदवार दिला होता. शिवसेनेने त्यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात स्वतःची प्रतिष्ठा लावली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभा घेतल्या होत्या मात्र आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला चारिमुंडयाचित करून २८ हजाराच्या मताधिक्याने विजय मिळविला होता व बंडखोरांना ही पाणी पाजले होते.मराठवाडा पदवीधर मतदार संघात भाजपचे उमेदवार शिशीर बोराळकर यांच्या विजयासाठी आमदार नितेश राणे प्रचाराच्या रिंगणात उतरले तेथेच त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांनी हिंगोली जिल्ह्यात आपला प्रचार दौरा सुरू केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + ten =