You are currently viewing कुडाळ तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतपेढी अध्यक्षपदी पाट हायस्कूलचे श्रीधर चव्हाण यांची निवड

कुडाळ तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतपेढी अध्यक्षपदी पाट हायस्कूलचे श्रीधर चव्हाण यांची निवड

कुडाळ तालुका शिक्षक- शिक्षकेतर पतपेढी अध्यक्षपदी पाट हायस्कूलचे शिक्षकेतर कर्मचारी श्रीधर चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुडाळ मराठा समाज सभागृहात पार पडलेल्या पतपेढीच्या सभेत एकमताने त्यांच्या अध्यक्षपदावर शिककामोर्तब कराण्यात आहे. शांत, संयमी व सर्वांना एकत्र घेऊन काम करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्वपूर्ण पैलू आहेत. त्यांच्या या गुणांचा व अनुभवाचा उपयोग नक्कीच हे अध्यक्षपद सांभाळताना होणार आहे.

त्यांचे पाट हायस्कूलचे सहयोगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 14 =