You are currently viewing वामनराव महाडीक हायस्कूलचा एक दिवस वनविभाग सोबत

वामनराव महाडीक हायस्कूलचा एक दिवस वनविभाग सोबत

*वामनराव महाडीक हायस्कूलचा एक दिवस वनविभाग सोबत*

*तळेरे हायस्कूल मध्ये जागतिक वन दिन साजरा*

कणकवली

माझी पृथ्वी माझी आईच आहे,माझे पर्यावरण हा माझा श्वास आहे, माझ्यासभोवतलचे पशु-पक्षी आणि झाडे माझे सगे सोयरे आहेत,अशा प्रकारे वनांशी असणारा आपुलकी भाव जपा, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे ही जाणीव म्हणे ठेवा हा संदेश देत वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय ,सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग (परिक्षेत्र- कणकवली)तसेच पंचायत समिती कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेमध्ये जागतिक वन दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समिती कणकवलीचे सचिन तांबे, सामाजिक वनीकरण विभागाचे एस.डी.इंदुलकर,वनपाल आर. आर.शेवाळे,ए.डी.इप्पर ,शाळा स.सदस्य उमेश कदम,प्रविण वरूणकर,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद,विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सुरुवातीला पर्यावरण संरक्षण ही माझी जबाबदारी यावर आधारित प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थी व सर्व शिक्षकवृंदांसमवेत प्रशाला ते तळरे बाजारपेठ अशी प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरी दरम्यान जागतिक वन दिनानिमित्त घोषवाक्ये देण्यात आली.वनांचे महत्त्व जाणा तरच आपण टिकू म्हणजेच वनसंवर्धन काळाची गरज या संकल्पनेवर आधारित प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी बाजारपेठ आणि बस स्थानक समोरील छत्रपती श्री शिवाजी रंगमंचावर पथनाट्य सादर केले.

*इन्सेट*
उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते आणि अशावेळी पशुपक्ष्यांना दाणा-पाण्याची सोय म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेतून करवंटी मध्ये धान्य व पाणी ठेवून त्या झाडाला योग्य पद्धतीने बांधल्या. हा एक छोटासा प्रयत्न आहे असे प्रयोग शक्य तितक्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरी करा म्हणजे पशु- पक्षांना पाणी मिळेल. असे आवाहन प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रशालेच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा