You are currently viewing रेडी माऊली देवीच्या अखंड हरिनाम सप्ताहाला माजी खास. निलेश राणे यांची भेट

रेडी माऊली देवीच्या अखंड हरिनाम सप्ताहाला माजी खास. निलेश राणे यांची भेट

वेंगुर्ला:

 

रेडी येथील प्रसिद्ध माऊली देवीच्या अखंड हरिनाम सप्ताहाला माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान च्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या भेटी दरम्यान माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सप्ताहातील दिंडी रथ पथकाना प्रमाणपत्रक, सन्मानचीन आणी मानधन वितरित करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी जि. प. सदस्य प्रितेश राऊळ, मंगेश कामात, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळकर तसेच वसंत तांडेल, भूषण सारंग, देवस्थान मानकरी, ग्रा. प.सदस्य, अमित गावडे, राहुल गावडे. जगनाथ राणे, महेश कोणाडकर, देवेंद्र मांजरेकर, प्रसाद रेडकर, ओंकार कोणाडकर, बुज्जी, रश्मी गावंडी, नितीन सावंत, नंदकुमार रेडकर, अण्णा गाडेकर, मनोज उगवेकर, भाई कांबळी, नार्वेकर, अंकुश राणे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी राणे यांच्या हस्ते देवीचा उत्सव यूट्यूब वर प्रसारण करणारे भाई पंडजी यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =