You are currently viewing साकेडी गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित…

साकेडी गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित…

साकेडी गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित…

ग्रामस्थांची महावितरण कार्यालयात धडक; समस्या दूर न झाल्‍यास आंदोलनाचा इशारा…

कणकवली

वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्‍याने साकेडी ग्रामस्थांनी आज महावितरण कार्यालयात धडक दिली. यावेळी झालेल्‍या चर्चेत दहा दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करण्याची ग्‍वाही महावितरण अभियंत्‍यांनी दिली. तर दिलेल्‍या मुदतीत वीज पुरवठा सुरळीत न झाल्‍यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

साकेडी गावातील ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर, सोसायटी संचालक राजू सदवडेकर, माजी उपसरपंच विजिन जाधव, ग्रामस्थ अजित शिरसाट, रवींद्र कोरगावकर, अरविंद सावंत आदींनी आज महावितरण कार्यालयात धडक दिली. तेथे उपस्थित असलेले उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांच्यावर ग्रामस्थानी प्रश्‍नांच्या फैरी झाडल्‍या. साकेडी गावात गेले पंधरा दिवस वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. परिणामी गावातील वीज पंप, घरगुती उपकरणे नादुरूस्त होत आहेत. पिठाच्या गिरणी देखील बंद ठेवाव्या लागत आहेत. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तातडीने सुरळीत करा अन्यथा कार्यालयातून हलणार नाही असा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला. यावेळी उपकार्यकारी अभियंता श्री. बगडे यांनी येत्‍या दहा दिवसांत साकेडी गावातील वीज समस्या दूर करण्याची ग्‍वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा