दोन गव्यांच्या झुंजीत गवारेडा गतप्राण…

दोन गव्यांच्या झुंजीत गवारेडा गतप्राण…

निरवडेतील घटना; वनविभागाची घटनास्थळी धाव

सावंतवाडी

निरवडे धनगर वाडीलगत वस्तीपासून काही अंतरावर असलेल्या जंगल परिसरात एक गवारेडा मृतावस्थेत आढळून आला. दोन गव्यांच्या झुंजीत तो गतप्राण झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. याबाबतची माहिती मिळताच निरवडे उपसरपंच चंद्रकात गावडे, ग्रा.प. सदस्य अर्जुन पेडणेकर, संतोष गावडे यांनी घटना स्थळी भेट देत पाहणी करून वनविभागाला पाचारण केले. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले सदरचा गवारेडा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मृत गवा रेड्या यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

निरवडे परिसरातील गावांमध्ये गेली अनेक वर्षे गवारेड्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. त्यांच्याकडून येथील शेतकऱ्याच्या शेतीबागायतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले जाते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी धनगरवाडी येथील ग्रामस्थांना वस्तिलगतच्या जंगलात मृत गवारेडा दिसुन आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा